लोक बिरादरी प्रकल्प हेमलकसा लोकबिरादरी प्रकल्प (एलबीपी) हे महाराष्ट्र सेवा समिती, वरोरा जि. चंद्रपूर द्वारे एक सामाजिक उपक्रम म्हणून राबविल्या जात आहे. या प्रकल्पा अंतर्गत रुग्णालय, शाळा व पशु अनाथालय चालविल्या जाते. 23 डिसेंबर 1973 रोजी सामाजिक कार्यकर्ते मा. बाबा आमटे यांनी माडिया गोंड यांच्या एकात्मिक विकासासाठी गडचिरोली जिल्ह्याच्या भामरागड तालुक्यातील हेमलकसा येथे प्रकल्पाचे कार्य सुरु केले. सदर प्रकल्प गडचिरोली जिल्हा मुख्यालय पासून 160 कि.मी. अंतरावर आहे व आल्लापल्ली पासून 60 कि.मी. दूरवर आहे. डॉ. प्रकाश आमटे आणि त्यांची पत्नी डॉ. मंदाकिनी आमटे या मेडिकल डायरेक्टर व मेडिकल ऑफिसर म्हणून येथे काम करतात व परिसरातील लोकांना आरोग्य, शैक्षणिक सुविधा उपलब्द करून दिल्या आहेत. त्यांना कम्युनिटी लीडरशिपसाठी 2008 मध्ये रॅमन मॅगसेसे पुरस्कार प्रदान करण्यात आले
सुरजागड प्रकल्पामध्ये स्थानिकांसाठी कौशल्य प्रशिक्षण केंद्र सुरू करणार आहे. सुरजागड लोह प्रकल्पातून हजारो नागरिकांना रोजगार मिळाला. शिवाय 342 कोटींचा महसूलही शासनाला प्राप्त झाला आहे. या भागातील नक्षलवाद कमी झाला असल्यानं पूर्ण क्षमतेनं प्रकल्प सुरू राहील, अशी ग्वाही शिंदे यांनी दिली.
मार्कंडा देव मार्कंडा देव हे भगवान शिवाचे लोकप्रिय स्थान आहे आणि केवळ महाराष्ट्रात नव्हे तर भारतातील सर्वत्रही धार्मिक व्यक्तींसाठी भव्यता आहे. सदर ठिकाण हे चामोर्शी उपविभागातील चामोर्शी तहसील अंतर्गत येतो. येथील लोकसंख्या सुमारे 1000 आहे. हे गाव वैनगंगा नदीच्या काठावर वसलेले आहे.
Comments
Post a Comment