हेमलकसा



 

  •  
  •  

  •  
  •  

  •  
  • लोक बिरादरी प्रकल्प हेमलकसा

    लोकबिरादरी प्रकल्प (एलबीपी) हे महाराष्ट्र सेवा समिती, वरोरा जि. चंद्रपूर द्वारे एक सामाजिक उपक्रम म्हणून राबविल्या जात आहे. या प्रकल्पा अंतर्गत रुग्णालय, शाळा व पशु अनाथालय चालविल्या जाते. 23 डिसेंबर 1973 रोजी सामाजिक कार्यकर्ते मा. बाबा आमटे यांनी माडिया गोंड यांच्या एकात्मिक विकासासाठी गडचिरोली जिल्ह्याच्या भामरागड तालुक्यातील हेमलकसा येथे प्रकल्पाचे कार्य सुरु केले. सदर प्रकल्प गडचिरोली जिल्हा मुख्यालय पासून 160 कि.मी. अंतरावर आहे व आल्लापल्ली पासून 60 कि.मी. दूरवर आहे.

    डॉ. प्रकाश आमटे आणि त्यांची पत्नी डॉ. मंदाकिनी आमटे या मेडिकल डायरेक्टर व मेडिकल ऑफिसर म्हणून येथे काम करतात व परिसरातील लोकांना आरोग्य, शैक्षणिक सुविधा उपलब्द करून दिल्या आहेत. त्यांना कम्युनिटी लीडरशिपसाठी 2008 मध्ये रॅमन मॅगसेसे पुरस्कार प्रदान करण्यात आले

    Comments

    Popular posts from this blog

    सुरजागड लोह खनिज

    मार्कंडा देव